अपघात रोखण्यासाठी ‘ ॲक्शन प्लॅन ‘, आयुक्तालयात विभाग प्रमुखांची बैठक

२२ नोव्हेंबर २०२२

पुणे


नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघाताने सर्व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली . भविष्यात असे अपघात होऊ नयेत , यासाठीच्या यांच्या उपाययोजना करण्याकरिता सर्व विभागांच्या प्रमुखांची विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थितीत बैठक झाली . अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे यावेळी निश्चित केले . या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रम कुमार , पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक , अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ . कुणाल खेमनार , महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास बोनाला , वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, नागरिकांचे जीव फार महत्त्वाचे आहेत . यापूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या ६ महिन्यांत येथील अपघाताचे प्रमाण कमी झाले होते . परत अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी दूरगामी उपाययोजना करण्याची गरज आहे . अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करण्यात येतील . पोलिस , महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अपघाताची कारणे शोधून काढली आहेत . इतर कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे , हेदेखील निश्चित केले आहे . त्यानुसार आराखडा तयार करण्यात येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *