आंबेगाव | खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक..

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
घोडेगाव –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

घोडेगाव ता. आंबेगाव येथे खवले मांजर या वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या टोळीला वनविभागाने अटक केले असून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव कोर्टासमोर हजर केले असता दि.१७/२/२०२४ पर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.

जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव मध्ये दि. १३/०२/२०२४ रोजी दक्षता पथक, पुणे यांचेकडील गुप्त माहितीनुसार जुन्नर फाटा रोडवरील एका हॉटेल समोर खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला समजली होती. याबाबत वनविभागाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली असता किरण सुनिल जाधव ( वय २३ वर्ष राहणार ब्राम्हणी ता. राहुरी जि. अहमदनगर ), धोंडू पांडुरंग बाणेरे ( वय ४३ वर्ष राहणार येळवणी (भिमाशंकर) येळवणी ता. खेड पुणे ),नवनाथ खंडु चकवे ( वय ३० वर्ष राहणार मढ ता. जुन्नर जि.पुणे) गणेश बबन कनिंगध्वज (वय ३६ सध्या रा. रांजणगाव ता. शिरुर जि.पुणे कायमचा पत्ता आळकुटी ता. पारनेर जि. अहमदनगर ) सविता भागवत कणसे (वय ४० वर्ष रा.मु.पो. उंबरज जि. सातारा) सुरेखा संजय धोत्रे (वय ५० वर्ष रा. मु. पो. घोडवली जि. सातारा) व गिता नंदकुमार जगदाळे वय ३६ वर्ष रा. चव्हाणवस्ती कुमठे ता. कुमठे जि. सातारा यांना मोक्यावर खवले मांजर -१, दुचाकी वाहणे- २, मोबाईल फोन इत्यादी सह ताब्यात घेत त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे. अटक सात जणांना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. घोडेगाव यांचे कोर्टासमोर हजर केले असता त्यांना दि. १७/०२/२०२४ पर्यंत वनकोठडी देण्यात आलेली आहे.

सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल पुणे दत्तात्रय मिसाळ, वनक्षेत्रपाल घोडेगाव महेश बाळकृष्ण गारगोटे, वनक्षेत्रपाल राजगुरुनगर प्रदिप रौंधळ, वनपाल श्री कुलकर्णी, श्री नलावडे, श्री टोकावडे, वनरक्षक श्री ढोले, श्री औटी, श्री पोत्रे, श्रीम. पवार, श्रीम. शिवशरण, श्री. पारखे, फिरते पथक, पुणे, श्री. मोटे, श्री. साबळे, वनपरिक्षेत्र घोडेगावकडील वनपाल श्री. झांझरे, श्री. लांघी, श्री. इथापे, श्री. सोनवणे, कु. जगताप, वनरक्षक श्री. गायकवाड, व वनपरिक्षेत्र घोडेगावकडील इतर सर्व वनकर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले. पुढील तपास श्री. एम.वी. गारगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव व त्यांचे पथक करीत आहे. वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर १९२६ या क्रमांकावर संर्पक साधुन माहिती देऊन सहकार्य करण्यात यावे असे आवाहन जुन्नर वनविभागा मार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *