छत्रपती संभाजीराजे बैठकीत बोलूच देत नाहीत, मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा थेट आरोप

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२६ ऑगस्ट २०२२


राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यातील अनेक घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मराठा समाजाच्या रखडलेल्या अनेक मागण्या असतानाच मराठा क्रांती मोर्चा आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये बेबनाव झाल्याचे चित्र समोर येत आहे. मराठा क्रांती मोर्चाने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अग्रेसर होत मोर्चे, आंदोलनं करण्यात आली, शरद पवारांपासून ते नितीन गडकरी यासारख्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देऊन मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या होत्या. मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच आता मात्र मराठी क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांमध्ये दरी पडल्याचे चित्र समोर येत आहे.

मराठी क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक झाला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी संभाजीराजे यांनी दमदाटी केल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयक यांच्यातील वाद रंगण्याची चिन्हं दिसून येत आहेत.मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून दमदाटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा चालू असतानाच मुंबईतील बैठकीत संभाजी राजे यांनी दमदाटी केल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी चाललेल्या या क्रांती मोर्चाच्या भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.मराठा समाजाच्या अनेक मागण्य सरकार दरबारी मांडण्याचे काम सुरु असतानाच हा वाद आता उफाळून आला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाच्या मागण्याबाबत चर्चा चालू असताना संभाजीराजे यांनी या बैठकीत काही बोलू दिले नाही असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आला आहे.मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबईतील बैठकीत संभाजीराजेंनी कुणी काही बोलले तर बैठकीतून निघून जाण्याची धमकी दिली होती असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे हे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले असल्याचे दिसत आहेराज्यातील मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मोर्चा, आंदोलनं आणि निषेध करुन मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडून मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत संभाजीराजे बोलू देत नाहीत तसेच छत्रपती संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चा संपवत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *