भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी एकनाथ पवार यांची निवड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ मे २०२२

पिंपरी


Bharatiya Janata Party state executive member Eknath Pawar
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी सत्तारुढ नेते नामदेव ढाके, भाजपा पिंपरी चिंचवड प्रवक्ते अमोल थोरात, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आदी या वेळी उपस्थित होते.

एकनाथ पवार यांनी या अगोदर भाजपची शहराध्यक्ष पद, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेतेपद इत्यादी पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, मला भाजपने दिलेली जबाबदारी प्रमणिकपणे पार पडणार असण्याचे एकनाथ पवार यांनी निवडीनंतर सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *