बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
दि. ०४/०१/२०२३
शिरूर
शिरूर : शिरूर येथील रामलिंग रोडवरील शिक्षक कॉलनीत, संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम पडले.
यावेळी शिरूर ग्रामीणचे (रामलिंग) माजी लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे, माजी आदर्श सरपंच नामदेव जाधव, उपसरपंच यशवंत कर्डिले, ग्राम पंचायत सदस्य हिरामण जाधव, भाजपचे केशव लोखंडे, पै. बाळा दौंडकर, मुळे सर, सागर गायकवाड, सचिन राजापुरे, नागेश पत्के, सनिराज पवार, प्रमोद पवार, दत्तात्रय धोत्रे, चंद्रकांत धोत्रे, जय धोत्रे, शरद क्षीरसागर, आदींसह जय संताजी बहुउद्देशिय सामाजिक प्रतिष्ठान रामलिंग रोडचे अध्यक्ष परशुराम मचाले, सचिव विजय सोनटक्के, खजिनदार संजय देशमाने, सदस्य रमेश मचाले, संजय जाधव, राजेंद्र कुलवडे, गोरख केदारी आदी पदाधिकाऱ्यांसह तेली समाजातील बहुसंख्य पुरुष व महिला उपस्थित होते.
यावेळी महिला भजनी मंडळातील सदस्या पंचकुला सोनटक्के, सुवर्णा गायकवाड, मिरा घोडके, आशा रणसींग यांनी तुकाराम महाराज व जगनाडे महाराजांवरील भजने वाद्याच्या साथीने गायली तर वैशाली देशमाने, शोभा मचाले, आशा मचाले, पूनम केदारी, प्रीती गायकवाड, उर्मिला राजापुरे, नंदा मचाले, शीला जाधव आदी महिलांसह सर्वच उपस्थितांनी त्यांना साथ दिली.
तर प्रमुख वक्ते संपत लोखंडे सर यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपल्या मनोगतातून इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी प्रमुख टाळकरी होते. त्यांनी तुकाराम महाराजांना सोळा वर्ष टाळकरी म्हणून अखंड साथ दिली. त्यामुळे त्यांना व त्यांच्या या सहकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना त्यांचे संपूर्ण अभंग पाठ होते. त्यामुळेच ज्यावेळी गाथा नदीत बुडविली गेली तेव्हा या सर्वांनी मिळून अवघ्या तेरा दिवसांत ते तुकाराम गाथेच्या स्वरूपात प्रकट केले. आणि ते लिहून काढणारे होते संताजी जगनाडे महाराज. गाथा ही नदीत बुडवीली गेली होती, तरीही ती गाथा तरली गेली असे म्हटले जाते. परंतु वास्तवात सत्य हे आहे की संत जगनाडे महाराजांनी ती संपूर्ण लिहून काढली आणि त्यामुळेच ती गाथा पुन्हा जशीच्या तशी नावारूपाला आली. म्हणूनच खऱ्या अर्थाने गाथा तरली, नाहीतर ती खरोखर नष्ट झाली असती. गाथा बुडविल्याने तुकाराम महाराजांनी अन्न पाणी वर्ज्य केले होते. परंतु अवघ्या तेरा दिवसांत ती लिहून जगनाडे महाराजांनी ती तुकाराम महाराजांसमोर मांडली, त्यावेळी तुकाराम महाराजांच्या आनंदाला पारावारा उरला नाही व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. त्यांनी जगनाडे महाराजांना घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडले. खरा इतिहास हा काही लोकांनी दडपून टाकल्यानेच काही समाजातील संतांचा व महापुरुषांचा इतिहास हा लोकांना खऱ्या अर्थाने कळू शकला नाही. ज्यांनी आपल्या समाजाचे नावलौकिक वाढविले त्यांची जयंती, पुण्यतिथी समाजबांधवांनी एकत्र येऊन साजरी करायलाच पाहिजे. कारण त्यामुळे पुढच्या पिढ्यांना या महात्म्यांचे महान कार्य समजू शकेल.” असेही संपत लोखंडे यांनी नमूद केले.
म्हणूनच म्हटले जाते की,
“संताजिंचा होता माथा,
म्हणून लिहून काढली तुकाराम गाथा”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सोनटक्के यांनी केले, सुत्रसंचालन परशुराम मचाले यांनी केले. तर आभार दत्तात्रय धोत्रे यांनी मानले.