आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने अनिल मेहर यांचा सन्मान

संपूर्ण राज्यात नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र श्रेष्ठ – वासुदेव काळे

 

महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यातील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कृषी विज्ञान केंद्र हे श्रेष्ठ असून क्रमांक एकचे असल्याचे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेवनाना काळे यांनी म्हटले आहे. नारायणगाव येथे आयोजित कृषी विज्ञान केंद्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर, बाप फाउंडेशनचे संचालक भाऊसाहेब घुगे, राष्ट्रवादीचे अनंतराव चौगुले, किसान मोर्चाचे संजय थोरात, सुरेश संचेती, डॉ. संदीप डोळे, ग्रामोन्नती मंडळांच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सदस्य तानाजी वारुळे, शशिकांत वाजगे, ऋषिकेश मेहेर, देवेंद्र बनकर, तानाजी बेनके, रमेश भुजबळ, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, कृषी विस्तार विषय तज्ञ राहुल घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायणगाव येथील पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वासुदेव काळे म्हणाले की, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पारदर्शक व समाजोपयोगी कार्य होत असून केंद्र सरकारला अपेक्षित असलेले काम समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचत आहे. कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, खते, साधनांचा सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होत आहे. शासन आणि शेतकरी यामधील दुवा म्हणून कृषी विज्ञान केंद्र काम करीत आहे. महाराष्ट्र गुजरात गोवा या राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांपैकी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र क्रमांक एकचे केंद्र आहे. पुढील वर्षापासून कृषी विज्ञान प्रदर्शन पाच दिवसांचे भरवावे अशी मागणी काळे यांनी केली. कार्यक्रमात मिलेट महोत्सव, रांगोळी, पोस्टर स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

केंब्रिज विद्यापीठाने तामिळनाडू गुजरात दिल्ली राज्यांसोबत सेंटर ऑफ एक्सलन्सचे करार केले आहे. परंतु ग्रामोन्नती मंडळाने सेंटर ऑफ एक्सलन्सचा सामंजस्य करार करून महाराष्ट्र सरकारच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. करार केल्यामुळे आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम होणार असून कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी, स्किल डेव्हलपमेंट होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील ढवळे व मेहबूब काझी यांनी केले तर आभार रवींद्र पारगावकर यांनी मानले.

राज्य सरकार ठामपणे उभे
——————–
राज्यातील सरकार ग्रामीण मंडळाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले असल्याचे भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *