पुणे दि 6 फेब्रुवारी –
येथील मृणाल्स एंटरटेनमेंटच्या वतीने मिस आणि मिसेस हेरीटेज इंडीया २०२४ हि स्पर्धा पुण्यात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 12 वर्षांच्या मुलींपासून 50 वर्षांच्या गृहिणींनी सहभाग घेऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन उपस्थिताना घडविले.
भारताचा ऐतिहासीक व सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी मृणाल एंटरटेनमेंटच्या संचालीका सौ. मृणाल सुमीत गायकवाड यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी रॅम्पवर विवीध ऐतीहासीका सांस्कृतिक थीम द्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येते. यावर्षी राम मंदीराच्या पार्श्वभुमिवर भारतातील विविध हिंदु मंदीरांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये भारतातील १६ राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
सुरुवातीला विधान परिषद सदस्या आ. उमाताई खापरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले… तसेच अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या हस्ते विजेत्यांना मुकुट घालण्यात आला.
या कार्यक्रमात कुमारी गटान चांदणी कोलारिया, जागृती गायकवाड आणि समृद्धी गावडे तर सौभाग्यवती गटात अंशुमाला सिंग, इरा विश्वा, सुयेशा पाटील तसेच क्लासीक गटात – ऋतुजा परांजपे, मनीषा दासगुप्ता, निधी शर्मा, विजेत्या ठरल्या.
हेरीटेज प्लस म्हणुग प्राची सिद्धीकी यांना, हेरिटेज जेम्स म्हणून तनिष्का मेहता, डॉ. शिल्पा सिंघाई यांना हेरिटेज अँबॅसीडर तर जया पाठक यांना कल्चरल अंबासिडोर म्हणुन गौरवीण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रशांत जोशी, विवा मेकअप स्टुडीयोच्या वैशाली, एम्प स्पोर्ट्सचे अजीत कुलकर्णी, जय महाराष्ट्र मसालेचे अजित गायकवाड, आपला आवाज आपली सखी_ संगीता तरडे, दालन महाराष्ट्राचे, गौरी क्लीनीक, नजाकत, अवनी नऊवारी यांचे सहकार्य लाभले. तर सुमित गायकवाड, हर्षल मराठे, मानसी दिघे, रविना शाह, सायली काळे, दत्ता ठोसर, साई इवेन्ट यांचे विशेष सहकार्य लाभले..