बंदचा निर्णय मागे ! माळशेज घाटातील वाहतूक पूर्ववत सुरूच राहणार; राष्ट्रीय महामार्ग उपविभागकडून माहिती

माळशेज – माळशेज घाटातील वाहतूक पूर्ववत सुरूच राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांचेकडून बुधवारी (दि. 17 ) रात्री उशीरा सांगण्यात आले. अहमदनगर कल्याण महामार्ग क्रमांक 61वर राष्ट्रीय महामार्ग क्र.61 मधील दुहेरी कॉक्रिटीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे.
त्यामुळे शुक्रवार (दि. 19) आणि पुढील दर गुरुवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले होते.

तसे सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग मुरबाड (ठाणे) यांनी एका परिपत्रकाद्वारे वाहतूक व्यवस्थेत बदल करून पर्यायी कल्याण- माळशेज घाट, खुबी, करंजाळे, खिरेश्वर, कोल्हेवाडी- सागनोरे, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, कोळवाडी, ओतूर, आळेफाटा, अहमदनगर वाहतूक व्यवस्था वळविण्यात आली होती;

परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे माळशेज घाटातील नियोजित ठिकाणच्या रस्त्याचे काम पुढे ढकलण्यात आले असून पुढील सूचना येईपर्यंत नगर कल्याण महामार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी चालू राहील, असे सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांचेकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *