घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा : माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१० ऑगस्ट २०२२

घोडेगाव


९ ऑगस्ट ,जागतिक आदिवासी दिन घोडेगाव ता. आंबेगाव येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच संपुर्ण जगभरात जागतिक देखील हा दिवस आनंदात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिवस यानिमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन आश्रमशाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच आदिवासी बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल, विविध विषयांवरील व्याख्याने आणि आदिवासी पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करुन मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

आदिवासी समाजाने हजारो वर्षांपासून जंगलांचे संवर्धन केले. आपली संस्कृती जपली. आधुनिकीकरण झाल्यानंतर आदिवासी समाज इतरांच्या तुलनेत थोडासा मागे राहिला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत अनेक योजना राबविल्या. आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा उघडून उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचेच फलित म्हणून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करु शकत आहोत. विशेषतः मुलींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले याचा विशेष आनंद मला आहे. भविष्यातदेखील हे विद्यार्थी उत्तुंग कामगिरी करतील असे म्हणत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी आपल्या भाषणातून जागतिक आदिवासी दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *