पुढचा टायर फुटून कंटेनर घुसला टायर दुकानात

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
११ जून २०२२

आळेफाटा


पुणे- नाशिक महामार्गावर आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. पुढचा टायर फुटल्याने कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पुण्याकडे जाणारा दुसरा कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला. हा अपघात शनिवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातामुळे आळेफाटा बायपास तसेच आळेफाटा चौकांमध्ये सिग्नल बसवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आळेफाट्या नजीक दोन मालवाहू कंटेनरचा अपघात झाला. अचानक समोर कंटेनर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून इंदोर (मध्यप्रदेश) येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर (एनएल ०१ एडी ८५३१) रस्त्याच्या कडेला असलेल्या टायर दुकानाची पत्र्याची भिंत पाडून आत घुसला. तर पुण्याकडून नाशिककडे जाणारा कंटेनर (डीडी ०३ के ९४०८) रस्त्याच्याकडेला पलटी झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी दुपारपर्यंत वाहने जाग्यावर होती.

दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा बायपासचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित असून शनिवारी व रविवारी आळेफाटा चौकात वाहनांची मोठी कोंडी होते. तर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने चालणाऱ्या मालवाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *