सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी… पुण्यात अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरुच

पुण्यात मागच्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांचीखांदे पालट सुरु आहे. पुणे ग्रामीण आणि शहर पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर आता पुण्याचे जिल्हाधिकाही बदलले आहेत. पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख पुण्याचे आधीचे जिल्हाधिकारी होते. त्यांची बदली क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली आहे तर सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सुहास दिवसे हे अजित पवारांच्या मार्जितले असल्याचे सांगितले जाते. ते मागिल  अनेक वर्षांपासून पुण्यातच कार्यरत आहेत.त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने काल (बुधवारी) काढले होते . दिवसे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारावा असे आदेशही राज्य सरकारकाढण्यात आले होते त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला. दिवसे हे सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते तर पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दिवसे यांच्या जागेवर नवीन क्रीडायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, तसेच एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, दिवसे यांची या जागेसाठी दावेदारी प्रबळ मानली जात होती.

दिवसे यांनी याआधी पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून  काम पहिले आहे तसेच त्यांनी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात पी एम आर डी एचे आयुक्त म्हणून देखील काम पाहिलेले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील यांना जवळील अधिकारी म्हणूनही दिवसे ओळखले जाते दिवसे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *