कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा – पृथ्वीराज चव्हाण

२९ डिसेंबर २०२२


अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील ३७ एकर १९ गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रात वारंवार धाडी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून महाराष्ट्र हे रेड राज्य झालंय, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्यांनी घोटाळे केले ते उघडकीस आले तर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यायला हवी. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवा, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार यांनी सिल्लोडचा मुद्दा मांडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वच्छ प्रशासन द्यायचे असेल तर त्यांनी कारवाई करावी, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशन तीन ते चार आठवडे घ्यावे, अशी आमची मागणी होती, असंही त्यांनी सांगितलं.

पीएमएलए कायद्याबद्दल विचार झाला पाहिजे. राज्यात गेल्या काही वर्षात २८९०० रेड पडल्या आहेत. आपलं राज्य म्हणजे “रेड राज्य” झालं आहे. न्यायालयाचा वापर राजकीय हत्यार म्हणून वापर होतो आहे. हे दुर्दैव आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.अनिल देशमुख यांना वर्ष दीड वर्ष आत ठेवलं, नवाब मलिक अजून आत आहेत. यावर आता अजून काय बोलणार? असा संतप्त सवाल त्यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *