घोडेगाव बी.डी. काळे महाविद्यालय येथे ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, एन. एस. एस. विभाग व एन सी.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.योगदिन कार्यक्रमाचे उदघाट्न महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕडव्होकेट मा. संजय आर्विकर यांचे शुभहस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन करून झाले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक योग प्रशिक्षक प्रा.भाऊसाहेब थोरात यांनी योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यात प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, विविध आसने, प्राणायाम, शुद्धिक्रिया व ध्यान याबद्दल मार्गदर्शन केले.शेवटी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕडव्होकेट संजय आर्विकर यांनी योग व प्राणायाम मनुष्याला किती आवश्यक आहे, आज जागतिक महामारीच्या काळात माणसाला आरोग्याचे महत्त्व कळाले आहे.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव किती लाखमोलाचा आहे,हे समजून घेऊन नित्य नियमाने ध्यान धारणा व प्राणायम करण्यासाठी योगदिन हा प्रेरक ठरावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी मा.प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव यांनीही योगदिनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वर्ग हजर होते.
