न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठया उत्सवात साजरा…

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलन मोठया उत्सवात साजरा.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक
स्नेहसंमेलन  आणि पारितोषिक वितरण  समारंभ  नटसम्राट निळू फुले नाट्य सभागृह येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पि.ची.म.न.पा महिला बाल विकास विभागाच्या माजी सभापती निर्मला कुटे, कल्चरल फौंडेशनचे विजय भिसे, कुरुळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिभा कांबळे, नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्रणव रोकडे,  संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सचिव संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, रामायण नृत्य आणि गौतम बुद्धचा चरित्र पट यांनी सुरुवात झाली.
या वेळी वाडिया कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. वसंत चाबुकस्वार, विरोधीपक्ष नेते नाना काटे, मां. नगरसेवक शत्रुघ्न काटे, मां. नगरसेवक चंद्रकांत नखाते, पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, यशदाचे डॉ. बबन जोगदंड, बार्टीचे प्रकल्प मॅनेजर सुमेध थोरात,  विठाबाई चाबुकस्वार, शोभा भालेराव, सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, बालगोपाल स्कूलचे संस्थापक कैलास कुदळे, कुस्तीगीर संघटनेचे काळुराम कवितके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अरुण तांबे या प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीमध्ये हर्षदा घोलप यांना सनदी लेखापाल परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवल्या बद्दल,

 पैलवान विजय नखाते यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, कुमार कार्तिक नखाते याला स्केटिंग इंटरनॅशनल लेवल चॅम्पियनशिप मध्ये तसेच मनोज बोरसे याला दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल शाल, श्रीफळ, संविधान देऊन संस्थेचे वतीने सन्मान करण्यात आला तसेच  मान्यवरांच्या  हस्ते शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व चषक देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच पाचवी,सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व राज्याची वेशभूषा करून आपली कला सादर केली, नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीतावर नृत्य सादर केले. मुलांचे विविध कलागुण पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षका  सुनंदा साळवी ,निशा पवार , रेणू राठी आणि जयश्री घोलप यांनी केले व आभारप्रदर्शन  सहशिक्षका  सोनाली पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *