नारायणगावच्या पुरुश्रुत संजय खिलारी यांनी यंदाही जिंकली भारतातील ‘अल्ट्रा स्पाईस रेस’ नावाची १७८० किमी ‘ ची आणखी एक कठीण रेस !

 

आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक १३ फेब्रुवारी २०२३

किरण वाजगे : कार्यकारी संपादक

 

गेल्याच वर्षी पुरुश्रूतने खिलारी यांनी भारतातील लेह लडाख येथील आव्हानात्मक अशी अल्ट्रासायकल शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकावले होते.तर या वर्षी भारतातील सर्वात लांब पल्ल्याची १७८० किमी ची खडतर अल्ट्रा सायकल रेस 124 तासांमध्ये पूर्ण करून, दुसऱ्या नंबराने विजय प्राप्त केला. आणि आता पुढे अमेरिकेत होणाऱ्या अल्ट्रा सायकल रेस मध्ये भाग घेण्यासाठी तो पात्र बनला आहे. आताची अल्ट्रा स्पाईस सायकल रेस ही कूर्गच्या नेत्रदीपक कॉफी आणि मसाल्यांच्या बागांमधून मडिकेरीपर्यंत पोहोचते. त्यानंतर वायनाडला जाण्यापूर्वी हा मार्ग सह्याद्रीपासून केरळमधील इरिट्टीपर्यंत खाली उतरतो. नीलगिरीच्या झाडांमधून निलगिरी पर्वताकडे जाताना हा मार्ग 25 किमीच्या वळणाच्या मार्गाने 2200Mt वर उटीपर्यंत चढतो. व वाटेला वळसा घालून परत त्याच वाटेने परत गोव्यात येते. अशी 1780 किमी अंतराची एकूण उंची 23,764 Mts रेस पंचवीस वर्षीय पुरुश्रूतने पूर्ण केली आहे .
औपचारिकपणे, अल्ट्रासायकलिंग म्हणजे 200 किलोमीटर (125 मैल) पेक्षा जास्त लांबीची किंवा सहा तासांच्या कालावधीची, एकच प्रयत्न म्हणून पूर्ण केलेली सायकल राईड असते.
अल्ट्रासायकलिंग ही सद्या सायकलिंगमधील सर्वात वेगाने वाढणारां प्रवाह झाला आहे! या अल्ट्रा स्पर्धांची सुरुवात 2019 मध्ये झाली जेव्हा काही खेळाडूंनी त्यांच्या बाईक संपूर्ण अमेरिकेत, आणि आता जगप्रसिद्ध ‘ रेस अक्रॉस अमेरिकेत’ धावल्या. ही खडतर स्पर्धा अनेक आव्हानांवर मात करायला लावून, तुमची आत्मशक्ती आणि तुमच्या तंदुरुस्तीची कसोटी पाहते.
या स्पर्धेत पुरुश्रू तला मदत करण्यासाठी आठ जणांचा ताफा होता. त्यात त्याचे आई-वडील सौ. नूतन खिलारी आणि संजय खिलारी यांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. पुरुश्रूतला मदत करण्यासाठी त्याच्या मागोमाग गाडीतून धावतांना त्यांची पण संपूर्ण रेस पूर्ण झाली आहे. अगदी डोळ्यात तेल घालून सर्वांना पुरुश्रुतवर लक्ष ठेवावे लागत होते. त्याच्या विजयाने सर्वत्र हर्ष उल्हासाचे वातावरण पसरले असून पुरूश्रुतवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे . पुरूश्रुतचा उत्साह इतका व्दिगुणित झाला आहे . पुरुश्रूतच्या परिवारात त्याचे काका श्री राजेश खिलारी हे तायकोंडो पूमसे मास्टर नॅशनल चॅम्पियन आहेत तर आत्या जयश्री खिलारी या स्पोर्ट्स माईंड कोच आहेत.पुरुश्रूत आता खूप तयारी करून पुढे येणाऱ्या २०२४ च्या अखेरीस ‘अल्ट्रा रेस अक्रॉस अमेरीका’ या १२ दिवसांत ४८०० किमी. पूर्ण करायच्या स्पर्धेत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आता पर्यंत या अमेरीकेत होणाऱ्या स्पर्धत एकच भारतीय तिसऱ्या क्रमांकाने विजयी झालेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *