एकनाथ शिंदे भाजपवर नाराज ? शिंदे -फडणवीस यांच्यात वादाची ठिणगी ?

दि. १२/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी : भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली.

परंतु भाजपने शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहेत असा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? असा प्रश्न विचारला. नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते. तीन जागा भाजप आणि दोन शिंदे गट असे सूत्र ठरले असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

देवेन भारती यांच्या निवडीवर नाराजी!

मुंबई पोलीस दलात देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आले. या निवडीवर पोलीस दलात नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा न करता परस्पर हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे. यामुळे या निवडीवर एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिंदेगट आणि भाजप यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *