चर्तुर्थी दिनी लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन

दि.१६ जुलै २०२२ (ओझर)

ओझर प्रतिनिधी | मंगेश शेळके

                           अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ४ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा.गणेशभाऊ कवडे,सचिव दशरथ FCमांडे ,विश्वस्त राजश्री कवडे यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त सचिन तापकीर,चंद्रकांत घंगाळे ,कल्याण कामठे,कौस्तुभ तापकीर,अनंत गायकर यांना मिळाला.


                          पहाटे चार ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख पंधरा हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. आज संकष्टी चतुर्थी! आपल्या सर्व मनोकामना श्री विघ्नहर्ता पुर्ण करो ही श्री. विघ्नहर् चरणी प्रार्थना!.

                          आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री. क्षेत्र ओझर तर्फे श्री.विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व चांदीचे अलंकार परिधान करण्यात आले. श्री.विघ्नहराला परिधान करण्यात येणाऱ्या सर्व रेशमी वस्त्र पोशाख व पेशवे कालीन मुकुटचा देखावा करण्यात आला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज कुसुरकर यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळाने दिली.

                           आजचे अन्नदाते माळाजी रमेश ढेंगे व संदीप भीमराव वासमकर कोल्हापूर यांनी केले संकष्टी चतुर्थीचे वारकरी अन्नदान जालिंदर शंकर वाळूंज यांनी अन्नदान केले.रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी देवस्थान ट्रस्ट च्या विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली.

                           आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे ,उपाध्यक्ष श्री अजित कवडे,सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे ,विश्वस्त बी.व्ही.अण्णा मांडे ,रंगनाथ रवळे,आनंदराव माडे,किशोर कवडे,मंगेश मांडे,गणपत कवडे,मिलिंद कवडे,कैलास मांडे,विजय घेगडे , श्रीराम पंडित,व सौ राजश्री कवडे यांनी केले. कोरोना चे सर्व नियम पाळून गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *