महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामागारांचे आरोग्य तपासणी शिबिर…

आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र ,उद्योगनगर, चिंचवड व लोकमान्य हॉस्पिटल,निगडी आणि प्रीमियम ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन तसेच ग्रीव्हज कामगार पतपेढीचे सचिव शिवराज शिंदे यांच्या प्रयत्नातून कंपनीमध्ये आरोग्य तपासणी शिबिर 3/2/2024 रोजी सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिरात 345 कायम व कंत्राटी कामगारांना मोफत टीटी इंजेक्शन देण्यात आले तसेच सर्व कामगारांच्या हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात आली.


या शिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल निगडीचे डॉक्टर जयवंत श्रीखंडे डॉक्टर सत्यजित तसेच त्यांचे सर्व सहकारी मदतनीस व सिस्टर्स यांनी इंजेक्शन व हाडांची तपासणी केली.
आरोग्य तपासणी शिबिराची प्रस्तावना प्रदीप बोरसे केंद्रप्रमुख यांनी केली ,त्यांनी केंद्राच्या विविध योजनांची माहिती सादर केली.


कंपनी व्यवस्थापनाकडून प्रवीण फिरके जयंत हर्षे सुरज कटोच यांनी मनोगत व्यक्त केले तसेच ईश्वर भोंग, आशिष पाटील शलाका मॅडम यांनी नियोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला .
या शिबिरास कामगार संघटनेचे नितीन आकोटकर व माणिक कुंभार आणि त्यांचे सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदरील शिबिरा बाबत कामगारांमधून अतिशय समाधान व्यक्त करण्यात आले व अशाच प्रकारच्या शिबिरांची तसेच योजनांची आमच्या कंपनीमध्ये विविध शिबिरे आयोजित करण्यात यावीत अशी कामगारांमधून विनंती करण्यात आली.
सदरील आरोग्य तपासणी शिबिराचे सूत्रसंचालन व आभार शिवराज शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *