ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
“दिवाळी सण मोठा…
नाही आंनदाला तोटा
असा साजरा झाला बालक मंदिर मध्ये दिवाळी सण मोठा”…
तिमिरातून तेजाकडे नेणारा, नवी ऊर्जा, प्रकाश, आनंद, उत्साह, नवचेतना देणारा आणि विवेक जागृत ठेवणारा सण म्हणजे दिवाळी. हा दिवाळी सण इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत मंगळवार दि.७/११/२०२३ रोजी श्रीमती. एस.आर. केदारी बालक मंदिर मध्ये दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलेले रंगीबेरंगी आकाशकंदील व माती पासून बनवलेल्या पणत्या तसेच रांगोळी काढून संपूर्ण शालेय परिसर सुशोभित करण्यात आला. सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस घालून शाळेत हजर होते.
या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालकमंदिर शाळेचे चेअरमन मा. श्री. अरविंदभाऊ मेहेर सर, बालकमंदिर समितीच्या सदस्या मा.सौ.मोनिकाताई मेहेर मॅडम, आपला आवाज न्यूज चॅनल चे वार्ताहर मा. श्री मंगेश शेळके सर , शिवजन्मभूमी न्यूज चॅनेलचे वार्ताहर मा. श्री. किशोर वारुळे सर, सकाळ न्युज पेपरचे वार्ताहर मा. श्री. रविंद्र पाटे सर, समाज दर्पण चॅनेलचे वार्ताहर मा. श्री. सचिन डेरे सर,शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता पारखे मॅडम, उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम, शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मा.सौ. रत्ना डुंबरे मॅडम इ. मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे व लक्ष्मीचे पूजन करून दिवे लावण्यात आले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ पारखे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या पाच दिवसांची अतिशय सुंदररित्या माहिती सांगितली व दिवाळीचे महत्त्व समजावून दिले. कु.शरयू सागर हांडे वसुबारस,सर्वज्ञ राजेंद्र बेलवटे धनत्रयोदशी ,
स्पंदन राहुल कोकणे- नरक चतुर्दशी ,अभिराज भानुदास बटवाल – बलिप्रतिपदा ,कु. इशा किरणकाळभोर लक्ष्मीपूजन ,आयुष मिलिंद वाजगे- भाऊबीज ,यानंतर शाळेचे चेअरमन मा. श्री.अरविंदभाऊ मेहेर सर व उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आवाहन केले .
दिवाळीचा महत्वाचा आंनद म्हणजे दिवाळी फराळ. सर्व विद्यार्थ्यांना लाडू व चिवडा दिवाळीचा फराळ म्हणून देण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आशा भुजबळ मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.अशाप्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणात दिवाळीचा कार्यक्रम पार पडला.