न्यू इंग्लिश स्कूल शिरूरचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल १००% : कु. पूर्वा रवींद्र खुडे प्रथम श्रेणीत

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०६/०२/२०२४.
शासकीय रेखाकला (चित्रकला) परीक्षा २०२३ – २४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर चा एलीमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही ग्रेड परीक्षांचा निकाल १००% लागला आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रमेश राजगुरे व कलाशिक्षिका नाजनीन आत्तार यांनी मार्गदर्शन केले.
इंटरमिजीएट परीक्षेला एकुण 47 विद्यार्थी बसले होते. पैकी 47 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100% निकाल लागला आहे. यात 6 विद्यार्थ्यांना ‘A’ ग्रेड, 8 विद्यार्थ्यांना ‘B’ ग्रेड, तर 33 विद्यार्थ्यांना ‘C’ ग्रेड मिळालेली आहे.
कु. पूर्वा रवींद्र खुडे, कु. संस्कृती रामचंद्र थोरात, कु. कार्तिकी विकास भालेराव, कु. श्रुतिका राजेश गायकवाड, तसेच प्रसाद निवृत्ती गायकवाड व प्रतीक दत्तात्रय गायकवाड यांना ‘A’ ग्रेड मिळालेली आहे.
एलीमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण 16 विद्यार्थी बसलेले होते. पैकी 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागलेला आहे. यात ‘A’ ग्रेड मध्ये 3 विद्यार्थी, ‘B’ ग्रेड मध्ये 1 विद्यार्थी, व ‘C’ ग्रेड मध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कु. शिल्पा रवी शर्मा, सुजित मिनीनाथ पाचर्णे, आकाश अशोक चव्हाण हे विद्यार्थी ‘A’ ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.


सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य झाकीरखान पठाण, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे पच्छिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्कूल कमिटी सदस्य व माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ राहुल घावटे, त्याचप्रमाणे सर्व सल्लागार समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, गुरुकुल विभाग समिती सदस्य या सर्वांनी अभिनंदन केल्याची माहिती, न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य संजय मचाले, उपमुख्याध्यापक मनोहर काळे, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *