शिंदेवाडीच्या ग्रामसेवकाच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१८ नोव्हेंबर २०२१

बेल्हे


शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या कामकाजाची चौकशी करून भ्रष्टाचारात दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारीत अर्जात म्हटले आहे की, ग्रामसेवक गुलाब जगताप हे गावात आल्यापासून मनमानी पद्धतीने गावात कारभार करत असून ते आपल्या पासून त्यांनी आम्हाला वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायतीच्या सगळ्या खात्यांचा हिशोब सांगितलेला नाही. यात काहीतरी काळेबेरे असून नक्कीच भ्रष्टाचार झाला असावा, तशी गावात चर्चा चालू आहे. तरी बीडीओ साहेबांनी ग्रामसेवक जगताप हे शिंदेवाडीत आल्यापासुन ग्रामपंचायतीच्या सगळ्या खात्याची चौकशी करून चौकशीचा अहवाल आम्हाला देणे, जेणेकरून त्यातून सत्य बाहेर पडेल.आपण जर यात लक्ष घातले नाही तर आम्ही दहा दिवसानंतर जिल्हा परिषद पुणे सीईओना भेटून त्यांना सत्य सांगून पुढील मार्ग अवलंबविणार आहोत.असे तक्रार अर्जात म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *