लोणी स्टेशन, थेऊर फाटा व उरुळी कांचन येथील अंडरपासला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मंजुरी

दि. ०७/०१/२०२३
पुणे


पुणे : पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन, थेऊर फाटा व उरुळी कांचन येथील चौकांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अंडरपासच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर सतत अपघात होत होते. या अपघातांमध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले होते. या महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी अंडरपास असावेत अशी नागरिकांची मागणी होती.

या मागणीचा पाठपुरावा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता. हडपसर ते उरळीकांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची मागणी डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी किमान महत्वाची जंक्शन सुरक्षित करण्यासाठी अंडरपास उभारण्याची मागणी केली होती.

त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोणी स्टेशन, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथे अंडरपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यानुसार उरळीकांचन (कि.मी.२८/९१०), लोणी काळभोर (कि.मी. १७/५००) आणि थेऊर फाटा (कि.मी. २०/२८०) या ठिकाणी अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *