शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिक्रापूरला आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०४/०१/२०२४.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना, “श्रीराम हे मांसाहारी होते” असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्या विधानाचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून, राज्यात व देशभरात त्याचे गंभीर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक हिंदू धर्मीय संत महंतांनी तर आव्हाडांचा कडवट शब्दांत समाचार घेत त्यांना अद्दल घडविण्याची वक्तव्ये केलीत.
महाराष्ट्रातही आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध होत असून अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात, शिक्रापूर येथील शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत व त्यांच्या विरोधात घोषणा देत जाहीर निषेध व्यक्त केलाय.
हे निषेध आंदोलन तालुका प्रमुख पै. रामभाऊ सासवडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्रापूर येथे घेण्यात आल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद यांनी दिली. या निषेध आंदोलनासाठी तालुका संघटक दत्ता गिलबिले, जिल्हा समन्वयक अण्णा दादा हजारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, उपतालुका प्रमुख हरिभाऊ भंडारे, उपतालुका प्रमुख गणेश कोतवाल, उपतालुका प्रमुख अमोल हरगुडे, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, अप्पा धुमाळ तसेच शिक्रापूर ग्राम पंचायतचे सरपंच रमेश गडदे, ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, बापू शिंदे, युवराज मांढरे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित असल्याची माहिती अनिल काशीद यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.
पिंपरी चिंचवड ऑलिंपिया गेम्सची क्रिडाज्योत प्रज्वलित…
पिंपरी चिंचवड ऑलिंपिया गेम्सची क्रिडाज्योत प्रज्वलित माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरीक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने…