डॉ. नीलम गो-हे आणि बाबा कांबळे यांना संविधानरत्न पुरस्कार प्रधान

बातमीदार : रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पुणेः-भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्यावतीने भारताच्या 71 व्या संविधान दिनानिमित्त देण्यात येणारा संविधान रत्नपुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे आणि गोरगरिब कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांना पुणे येथे कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स हॉलमध्ये सन्मानपूर्वक देण्यात आला ,
भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.गौतम बेंगाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र माळवदकर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, अॅड. प्रमोद आडकर, नरसेविका लताताई राजगुरू, अमोल देवळेकर , माहारष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर , नगरसेवक अविनाश बागवे , विवेक चव्हाण , राहुल डंबाळे, संदीप बर्वे, फिरोज मुल्ला , आदी मान्यवर उपस्थित होते .

या वेळी श्रीपाल सबनीस यांनी असे म्हटले की तळागाळातील शेवटच्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाने मूलभूत हक्क मिळवून दिले आहे, काही फुटीरतावादी व्यति कडून संविधानातिल मूल्यांचा ऱ्हास होत असून, अश्या कार्यक्रमामुळे संवैधानिक हक्क अधिकारांची नागरिकांमध्ये जनजागृती होईल , सविधान रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नीलम ताई गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

निलम गोऱ्हे : महाविकास आघाडी मुळे प्रबोधनाच्या परंपरांना बळ मिळाले असून सध्याच्या स्थितीत काही आव्हाने व काही शक्तीस्थाने संविधानाची मूल्ये, तत्व विचार व कृती समोर दिसतात . जातीच्या चौकटी बाहेरच्या विवाहांना विरोध, ऑनर किलिंगच्या घटनां , महिलांची फसवणूक ,ही आव्हाने आहेत आपली न्यायसंस्था , पोलीस, शिक्षक ,वैद्यकीय सेवा ,उद्योग क्षेत्र ही सामाजिक शक्ती स्थाने आहेत ,या सर्वांचा विचार करूनच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा राजकीय निर्णय झाला.

बाबा कांबळे: गोरगरीब कष्टकरी जनतेची चळवळ सुरू ठेवत असताना संविधानातील सर्वसामान्य जनतेला हक्क अधिकारा मिळाल्या मुळे त्यांच्या जगण्याला बळ मिळत आहे , देशांतील चाळीस कोटी असंघटित कष्टकऱ्यांन साठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा झाला पाहिजे , या साठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

विठ्ठल गायकवाड यांनी सविधान रत्न पुरस्कार देण्या मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की यापूर्वी ते पुरस्कार यांना देण्यात आले त्यांचे नाव जाहीर केले आहे आणि नीलम ताई गोऱ्हे आणि बाबा कांबळे यांना पुरस्कार का देत आहोत याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी , प्रतीक गायकवाड , अजय लोंढे, रमेश सगट , राहुल चांदेकर , सागर आल्हाट यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *