अनपेक्षित सत्काराने एसटी कर्मचार्‍यांस सुखद धक्का

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२० एप्रिल २०२२

ओझर


बर्‍याच दिवसापासून एसटी चा चाललेला संप ,प्रवाशांची होणारी गैरसोय, यामुळे सामान्य जनता हतबल झाली होती . नारायणगाव एसटी आगार तर्फे अंगारकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नारायणगाव ते ओझर – ओतूर एसटी गाड्या चालू केल्या आणि प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवली, या चांगल्या उपक्रमा बद्दल धनगरवाडी , कारखाना फाटा ओझर रोड येथील मोहटादेवी व्यापारी असोसिएशन तर्फे वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला, हा सत्कार स्विकारून दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांना गहिवरून आले, ह्या अनपेक्षित सत्काराने त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, प्रत्येक चांगल्या कार्यामागे मंडळ हे नेहमी प्रत्येकाच्या पाठीशी असते,हाच शुद्ध हेतू ठेवून चालू झालेल्या एसटी वाहक व चालकांचा मोहटादेवी व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . या निमित्ताने मोहटादेवी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खिलारी, तज्ञ सल्लागार विकास भोर, खजिनदार गोविंद गावडे, अक्षय घुले अंबादास टेंभेकर ,प्रदीप गगे, व प्रवास करणारे प्रवासी हजर होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *