पिंपरी चिंचवड चे आमदार TDR च्या मुद्द्यावर गप्प का ?

पिंपरी-चिंचवड
दि.18/12/2023

टीडीआर प्रकरणी SIT स्थापन करा – आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड

नागपूर येथे राज्याचे हिवाळा अधिवेशन सुरू आहे.आणि या अधिवेशन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत TDR घोटाळा झाला असून या हजारो कोटी रूपयांच्या झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे…
TDR घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पत्रकार परिषदेसाठी प्रकाश हगवणे आप पिंपरी चिंचवड प्रवक्ता प्रकाश हगवणे,पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे,
आप पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष सरोज कदम,
आप पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अशोक लांडगे
आप डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ प्रशांत कोळवले हे उपस्थित होते…

पत्रकार परिषदेत आप ने
टी. डी. आर प्रकरणातील उपस्थित केलेले महत्वाचे प्रश्न ?

सदर टी.डी.आर प्रकरणी धोरणात्मक बदल का करण्यात आले ?

महापालिकेची अनेक ठिकाणी अशाच पध्दतीने समावेशक आरक्षणाखाली म्हणजेच एकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत बांधकामे सुरु आहेत. सर्व प्रकरणांत मोबदला देताना २६,६२० रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार देणे बंधनकारक असताना नियमांचा विपर्यास करून या आरक्षणाबाबत ६५,०६९ रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला ?

मोबदला देताना शासकिय रेडी रेडीकनरनुसार बांधकामाचा दर २६,६२० रुपये प्रति चौरस मीटर असताना तो ६५,०६९ रुपये प्रति चौरस मीटर का दाखवला ?

राजकीय प्रश्न

शहरातील विविध विषयांवर ४ आमदार विधी मंडळात चर्चा करतायेत मग टी. डी. आर विषयावर गप्प का?

आजच्या बाजारमुल्यानुसार जादाच्या टीडीआरची किमंत होते तब्बल १५११ कोटी रुपये त्या मध्ये तब्बल ६००० मोहल्ला क्लिनिक तयार झाले असते किंवा ४-५ मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाले असते.

मोदीजींना आमचा प्रश्न ,तोडून मोडून हे सरकार आपण स्थापन केले, स्थानिक स्वराज्य निवणूका विनाकारण पुढे ढकलताय, कश्या साठी ? आयुक्त तथा प्रशासक मार्फत लोकांच्या पैश्याचे collection करण्या साठी ?

आयुक्त शेखर सिंह भाजपाचे collection agent आहेत का ?

आम आदमी पार्टी च्या वतीने सदर विषय प्रकरणी मुख्यमंत्र्यांना खालील मागण्या करत आहोत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॅग (CAG) मार्फत चौकशी करण्यात यावी (मुंबई मनपा च्या धर्तीवर)

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी नगर विकास खात्याचे देखील मंत्री असल्यामुळे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार जी जिल्ह्याचे पालक मंत्री असल्यामुळे यांनी अजून देखील हिवाळी अधिवेशनामध्ये एवढ्या मोठ्या घोटाळ्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आहे. लवकरात लवकर त्यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान त्याचे स्पष्टीकरण देऊन सनदी अधिकाऱ्यांची (SIT) टीम बनवून सदर प्रकरणाची चौकशी करावी.

आयुक्त श्री. शेखर सिंह तसेच नगररचना व विकास, बांधकाम परवाना, स्थापत्य च्या सर्व अधिकाऱ्यांनी SIT मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे.

२०१७ साला नंतर मनपा हद्दीतील सर्व टी. डी. आर प्रकरणांची (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी ?

भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना दिलेला टी.डी.आर रद्द करण्यात यावा.अशा विविध प्रश्नांवर पिंपरी-चिंचवड शहर आप ने पत्रकार परिषदेत आपले प्रश्न उपस्थित करत हजारो कोटी रुपयांच्या या TDR घोटाळ्याच्या SIT चौकशीची मागणी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *