जागतिक डॉक्टर दिन : समाजासाठी झटणारे डॉक्टर हेच खरे हिरो ! – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे शहर भाजपातर्फे डॉक्टरांचा सत्कार

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १ जुलै २०२१
कोरोनाचा काळ हा माणूस आणि माणुसकीची खरी परीक्षा घेणारा होता. यावेळी जग थांबले असताना डॉक्टर देव बनून अहोरात्र रुग्णांची सेवा करत होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. यामुळे डॉक्टर हे खरे हिरो असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. अशा भावना भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी (दि.१) डॉक्टर दिनानिमित्त व्यक्त केल्या.

जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आमदार महेश लांडगे यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) डॉक्टरांना भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ.विनायक पाटील, डॉ.मारुती गायकवाड, डॉ. दिनेश गाडेकर, सिस्टर मोनिका चव्हाण, मारुती जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भोसरी चऱ्होली मंडळ अध्यक्ष उदय गायकवाड, पंकज शर्मा अमित महाडिक, ऋषिकेश भालेकर प्रमोद पठारे इत्यादी उपस्थित होते.

Advertise

आमदार लांडगे म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टरांनी देशाला तारले आहे. एकीकडे कोरोना रुग्णाजवळ जाण्यास कोणी धजावत नसताना डॉक्टर मात्र जीवाची पर्वा न करता त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत होते. विशेष म्हणजे डॉटर हे फक्त उपचारच नाही तर मार्गदर्शन आणि भावनिक आधारही देत असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. सीमेवर लढणाऱ्या सैन्याप्रमाणे डॉक्टर हे योद्धा ठरले आहेत. डॉक्टरांसोबतच त्यांच्या इतर सहकारी, आणि स्टाफने तोडीस तोड काम केले आहे. कोरोनाचा धोका आटोक्यात येईल, भविष्यात कोरोना संपेलही मात्र डॉक्टरांनी या काळात घेतलेली जबाबदारी आणि केलेले उल्लेखनीय कार्य कायम स्मरणात राहील. आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाचे कौतुक केल्याने सर्व डॉक्टर आणि स्टाफने आभार व्यक्त केले.

*
भाजपतर्फे शहरभरात डॉक्टरांचा सन्मान…

डॉक्टर दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टरांचा यथोचित सन्मान करण्याचे आवाहन आमदार लांडगे यांनी सर्व पदाधीकारी कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानुसार शहरातील सर्व पदाधीकारी, कार्यकर्ते, मंडलप्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील डॉक्टरांचा सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *