अज्ञात वाहनाच्या धडकेत नऊ वर्षाचा बिबट्या ठार

नारायणगाव येथील घटना

नारायणगाव
अज्ञात वाहनाच्या धडकेत आज रविवार दिनांक १७ रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास साधारणतः नऊ वर्ष वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या शेतालगत साई मल्हार हॉटेल समोर ही घटना घडली.
बरोबर रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या मरून पडल्यामुळे काही वेळ तेथे ट्रॅफिक जाम झाले होते .
ही माहिती कळताच वनक्षेत्रपाल प्रदिप चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, बिबट रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे, नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ माजी उपसरपंच संतोष वाजगे, वन कर्मचारी खंडू भुजबळ, हर्ष भास्कर, पुष्कराज तांबे, दर्पण पवर, विपुल कोल्हे, आदित्य डेरे तसेच स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला उचलून वाहनात ठेवले . त्यामुळे वाहतूक मोकळी होऊ शकली.
दरम्यान काल एक बिबट्या खोडद हिवरे येथील शाम अमृता भोर यांच्या विहिरीत मृत अवस्थेत आढळला होता.
या बिबट्यांवर पुढील सोपस्कार करण्यासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *