पुण्यात राष्ट्रवादीचा निभाव लागणं अशक्य ? अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीमागचं सत्य आलं समोर

पिंपरी : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होतेय. त्यावर आता भाजपच्या वतीने प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. यात अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीवर भाष्य करण्यात आलं आहे.

भाजपने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! शरद पवारांच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर! पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचा आता पुण्यात निभाव लागणं निव्वळ अशक्य आहे!, असं भाजपच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हे यांच्या कथित नाराजीवर भाष्य केलंय. मुळात राज्यामधील अपयश पचवण्यासाठी भाजप नेते वेगवेगळ्या क्लुप्त्या काढत आहेत. अमोल कोल्हे नाराज नाहीत. त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल, असं वळसे पाटील म्हणालेत.

तर काही दिवसांआधी केंद्रीय रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचं अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात झालं. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल 25 मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा याची माहिती समोर आली नाहीये. पण या भेटीमुळे अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा अधिक गडद झाल्या आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांची कथित नाराजी सत्यात उतरणार का ? आगामी काळात कोल्हे नेमकी काय भूमिका घेणार ? नाराजीवर काय भाष्य करणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *