प्रियांकाच्या आत्महत्येप्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्यासह पती व मुलाला अटक

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ जुलै २०२२

आळंदी


पिंपरी चिंचवड च्या भाजपच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी प्रियांका हिच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर त्यांचे पती अशोक उमरगेकर (वय ६०) आणि मुलगा अभिषेक उमरगेकर (वय २७) यांना अटक करण्यात आलेली आहे.

याप्रकरणी प्रियांका यांचे वडील अनिल उर्फ बापूसाहेब घोलप (वय ४५ ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घोलप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रियांका यांचे आठ महिन्यांपूर्वी अभिषेक उमरगेकर यांच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या मुलीचा राहिलेला हुंडा म्हणजेच संसारोपयोगी साहित्य व फर्निचर कधी आणणार याबाबत तिचा शाररिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे म्हटले.

प्रियांका यांनी रविवारी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान राहत्या घरी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रियांका यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल हाती आला होता. या अहवालानुसार त्यांनी आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *