खेळत असताना बारा वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

     शिरूर तालुक्यातील मौजे अण्णापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. त्यात खेळत असताना व थकल्यामुळे बाजूला जाऊन बसलेल्या ई. सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देव किसन ठुबे (वय वर्ष १२, रा. अण्णापूर ता शिरूर) असे मयत मुलाचे नाव आहे.
मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता देव किसन ठुबे हा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी देव हा शाळेत किडा स्पर्धा चालु असतांना व खेळताना थकल्यावर बाजुला जाऊन बसला होता. त्यावेळी त्याला चक्कर आली. त्यामुळे तो तसाच जागेवर पडला. शाळेतील शिक्षक मगर सर व इतरांनी त्यास प्राथमीक आरोग्य केंद्र आण्णापुर येथे नेले. तेथुन शिरूर येथील श्रीगणेशा हॉस्पीटल येथे नेले. परंतु तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *