बिबट सफारी आंबेगव्हाणला होण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील – आमदार अतुल बेनके

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२९ मार्च २०२२

आंबेगव्हाण


बिबट सफारीसाठी वनविभागाकडून कार्यवाही जलद गतीने सुरू झाली आहे जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आंबेगव्हाण येथील वन विभागाच्या जागेची पाहणी कमिटीसह केली आहे. पुढील आठवड्यात अहवाल सादर करून यात भौगोलिक असलेले निकष तसेच इतरत्र जागांमध्ये संभाव्य त्रुटी यांचा समावेश असणार आहे. जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र असून महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधून घेणारा विषय ठरलेल्या सफारी कोठे होणार? याबाबत जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण गावांमध्येच व्हावी याबाबतचे पत्र माळशेज पट्ट्यातील ग्रामपंचायतींनी आज आमदार अतुल बेनके यांना दिली.

आंबेगव्हाण (ता.जुन्नर)येथे दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी जुन्नर तालुक्यात होऊ घातलेल्या बिबट सफारीवर आमदार अतुल बेनके म्हणाले की,जुन्नर तालुक्यातील चार ठिकाणची जागेची पाहाणी समितीकडून झाली म्हणजे ती जागा निश्चित झाली असे नाही.२०१६ ला देखील फक्त पाहणी झाली पण पुढे काहीच झाले नव्हते,पण या वेळी चार जागेची पाहणी झाली तरी पाहिले प्राधान्य बिबट सफारीसाठी आंबेगव्हाणच्या जागेला दिले जाईल असे बेनके यांनी यावेळी बोलताना सागितले. बिबट्याचा नैसर्गिक अधिवास असणारा हा भाग आहे. या भागाच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करत असताना या भागाची विस्तृत माहिती यावेळी आमदार बेनके यांनी घेतली आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे जिओ मॅपिंगद्वारे देखील काही भागांचा आढावा देखील बेनके यांनी यावेळी घेतला.

यावेळी बोलताना मोहित ढमाले म्हणाले की, तांत्रिक दृष्टया जर काही अडचणी नाही आल्या तर प्रथम प्राधान्य हे आंबेगव्हाणलाच राहील. अंकुश आमले म्हणाले की, बिबट सफारी ही आंबेगव्हांण येथे झाली तर लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, जर या बिबट सफारी साठी मला उपोषण करायची वेळ आली तर मी उपोषण देखील करणार आहे असे सूतोवाच अंकुश आमले यांनी यावेळी काढले. तसेच संतोष मेंगाळ म्हणाले की, याभागात बिबट सफारी साठी आमचा आदिवासी भागातील ग्रामस्थांचा कुठलाही विरोध नाही,परंतु आदिवासी समाजाला देखील विश्वासात घेऊन हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच व्हावा अशी आमची इच्छा आहे. तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान घोलप म्हणले की, आंबेगव्हांण याठिकाणी बिबट सफारी होण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते आमदार साहेब आपल्या सोबत आहोत बिबट सफारी ही आंबेगव्हांण लाच झाली पाहिजे त्यासाठी कधीही मदत लागली तर आम्ही आपल्या सोबत पक्ष राजकरण सोडून उभे राहू असे त्यांनी सांगितले. तसेच जुन्नर चे सहाय्यक उपवनसंरक्षक अमित भिसे म्हणले की वरिष्ठांशी चर्चा करून या भागाबाबत सकारात्मक विचार केला जाईल.

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी जि.प सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे,मा. सभापती विशाल तांबे, देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,बाजार समितीचे संचालक संतोष तांबे,भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष तांबे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष भगवान घोलप, कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे,शेतकरी संघटनेचे लक्ष्मण शिंदे,आंबेगव्हांणचे सरपंच निवृत्ती धराडे,ओतूरच्या गीतांजली पानसरे, रोहोकडीचे सचिन घोलप, उदापुरचे सचिन आंबडेकर, बल्लाळवाडीचे संजय नायकोडी, तानाजी डुंबरे,स्वप्निल आहिनवे प्रशांत डुंबरे, तसेच जयप्रकाश डुंबरे, सुदामशेठ घोलप, तुकाराम गायकर, सोसायटी चेअरमन महेश हिंगणे, ईश्वर केदारी,उपसरपंच दत्तात्रय गवांदे,ग्रामसेवक संतोष भोसले ,वाय जी गायकर, प्रकाश हिंगणे, राजेंद्र गायकर,राजाराम गायकर, भानुदास गायकर, मयूर गवांदे, अजय गवांदे, प्रवीण लंबे, शंकर गायकर, शुभम लंबे, कैलास गायकर,शांताराम लंबे, विजय वाघमारे,भरत गवांदे, विजय पावडे, गणेश येंधे, भाऊसाहेब लंबे, रोहित गवांदे, संतोष मेंगाळ, अतुल तांबे,सोनल डुंबरे, विवेक पानसरे, सोरमिल डुंबरे, सचिन घोलप, नवनाथ घोलप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कालेकर यांनी केले तर आभार निलेश महाले यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *