विभागीय संपादक रामदास सांगळे
जुन्नर तालुक्यात व्हेंटिलेटरवर अभावी कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. तालुक्यात सोमवार (दि.२६) पर्यंत १ हजार ७३२ रुग्ण ऍक्टिव्ह असून तालुक्यात केवळ ८ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत.तालुक्यात ३२ कोविड सेंटर असून ३६६ ऑक्सिजन बेड,८ व्हेंटिलेटर,८१ आयसीयु तर ८०९ साधे बेड असे एकूण १ हजार २६४ बेड उपलब्ध आहेत. तालुक्यात व्हेंटिलेटरचा अभाव असल्याने रुग्णांची वणवण होऊन व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
जुन्नर तालुक्यात रोज शंभर च्या आसपास रुग्ण संख्या वाढत आहे. सरकारी कोव्हीड सेंटर ला जागाच नाही तर खाजगी दवाखाने देखील गच्च भरलेले पहायला मिळत आहे. ज्या कोव्हिड सेंटर ला जागा आहे तेथे ऑक्सिजन बेड ची उपलब्धता नाहीत.लोकप्रतिनिधिंनी यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी चर्चा रुग्णांचे नातेवाईक करतांना पहायला मिळत आहे. तर खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन बेड आहेत पण ऑक्सिजन चा तुटवडा भासत असल्याने काही डॉक्टर रुग्ण दाखल करून घेत नाहीत परंतु काही रुग्णांना मात्र व्हेंटिलेटर ची गरज भासते त्या साठी नातेवाईकाना शहरी भागात सर्वत्रच पळापळ करून शेवटी निराश व्हावे लागत आहे. काही ठिकाणी ऊपलब्ध होत परंतु वेळ निघून गेलेली असल्यामुळे नातेवाईकाना आपला रुग्ण गमवावा लागतो. हे सर्व थांबावे या साठी तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांनी जुन्नर तालुक्यातच व्हेंटिलेटर ची सोय करून द्यावी.रुग्णांची वणवण व मृत्यू रोखण्यासाठी व्हेंटिलेटरची मागणी पत्रकार कैलास बोडके यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
उमेश गोडे
आरोग्य अधिकारी,जुन्नर