पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कोल्हापूरचे अधीक्षक अभिनव देशमुख यांची नियुक्ती

बातमी प्रतिनिध – मोसीन काठेवाडी
नावाप्रमाणेच कामात देखील अभिनव असलेले असे
कोल्हापुर जिल्ह्याचे एक कर्तव्यदक्ष अन् धडाकेबाज पोलीसअधीक्षक म्हणून प्रचलित असलेले IPS आधिकारी डॉ अभिनव देशमुख साहेब यांची पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक पदी नव्याने नियुक्ती झाली असल्याची माहीती गृहविभाकडुन प्राप्त होत आहे.

या पुर्वी त्यांनी गडचिरोली पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्य बाजवले आहे तसेच गडचिरोली येथील सेवेबाबत आंतरिक सुरक्षा पदक त्यांना मिळवले आहे व राज्यनिवडणुक आयोगाच्या वतीने २०१९ चा लोकशाही पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची गेल्या आठवड्यात पदोन्नती झाल्याने पुणे ग्रामीण अधीक्षक पदावर कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात बदल्यांचे आदेश आले त्यात धडाकेबाज आधिकारी डॉ. अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे . कडक शिस्तीचे म्हणून ते ओळखले जातात तसेच अवैध प्रकारांना आळा घालणे तसेच गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी ते प्रचलित आहे.