मीना व कुकडी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या – आमदार अतुल बेनके

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१० मे २०२२

बेल्हे


जुन्नर तालुक्यातील मीना व कुकडी नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.

पांडुरंग पवार यांनी सांगितले की, आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यात मीना व कुकडी नदीवर २५-३० वर्षांपूर्वी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. सदर बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही दुरुस्ती करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिक वारंवार करत आहे.

यामध्ये अनेक बंधाऱ्यांचे ढापे बदलणे, रेलिंग दुरुस्त करणे, बंधाऱ्यांवरील रस्त्याच्या कडेची माती काढून खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजविणे, बंधाऱ्यांचे पडलेले प्लास्टर दुरुस्त करणे, संरक्षक कठडे तुटलेले दुरुस्त करणे आदी.कामे होणे आवश्यक असून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात केली असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच कुकडी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे व कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली असल्याचे पांडुरंग पवार यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *