महाविकास आघाडी विरोधात उद्या मुंबईत भाजपचं माफी मांगो आंदोलन – आशिष शेलार

१६ डिसेंबर २०२२


सध्या राज्यात महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद सुरु आहे. यावरून एकीकडे शनिवारी मविआकडून महामोर्चापुकारण्यात आला असताना आता, दुसरीकडे भाजपनेही ‘माफी मांगो’ आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असा उल्लेख गुरुवारी संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यावरून शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत, असं म्हणत शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते तरी उद्धवजींच्या सेनेला मान्य आहे का असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

महामानवाविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे कसे मान्य करू शकतात, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शेलार यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीकडून वारंवार महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहेत. या विरोधात भाजप मुंबईभर माफी मांगो निदर्शनं करणार आहे. जागोजागी ‘उद्धवजी माफी मागा, नानापटोले माफी मागा, अजित वार माफी मागा’ हे आंदोलन करण्यात येणार आहे. काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *