मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील; उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२३ सप्टेंबर २०२२


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर टीका करताना मनसेलाही खोचक टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा मुन्नाभाई असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू , असं ट्वीट गजानन काळे यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *