आळे ग्रामपंचायत राबवते झिकापासून बचाव मोहीम…गावातील नागरिकांना ग्रामपंचायत करते जनजागृती…

आळे:- झिका विषाणू पासून बचावासाठी जुन्नर तालुक्यातील आळे ग्रामपंचायतीने मोहीम सुरू केली आहे. गावात मोठ्या प्रमाणात दवंडीच्या व फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात फवारणीला सुरूवात केली असून ग्रामस्थांना दवंडी च्या माध्यमातून सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावकऱ्यांना झिका या विषाणू पासून बचावासाठी विविध उपाय योजना ग्रामपंचायत करत आहे.

गावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे,ग्रामसेवक वणघरे व सर्व सदस्यांनी गावाला झिका विषाणूपासून बचावासाठी कंबर कसली आहे.राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने अशा प्रकारे मोहीम राबविल्यास झिका विषाणूचा नायनाट होऊ शकतो.