ज्येष्ठ नागरिकाची बॅग व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव बस स्थानकात गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान भिमा भाऊ उनवणे (राहणार निमगावसावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांचा मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील,पोलीस हवालदार काळुराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते  होमगार्ड अक्षय ढोबळे, होमगार्ड सुरज कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बस स्टॅन्ड येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले व संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज देवराम शिर्के (राहणार डोंगरी चाळ,अंधेरी मुंबई) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपीकडुन चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळुराम साबळे हे करत आहेत.
ही यशस्वी कामगीरी  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार काळुराम साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते, गोरक्ष हासे,होमगार्ड सुरज कुऱ्हाडे,अक्षय ढोबळे, ट्रॅफिक वॉर्डन मुनाफ पिंजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू मोमीन, अतुल डेरे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *