मी बाहेर असो वा नसो २०२४ पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होईल – संजय राऊत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


मी बाहेर असो वा नसो २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं मोठं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही ते सांडू देणार नाही, असंही राऊत यावेळी म्हणालेत. सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिंदे गट आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील, २०२४ पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा नसो मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *