विभागीय संपादक रामदास सांगळे
आळेफाटा:-साथ रोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी वडगाव आनंद ग्रामपंचायत हद्दीतील तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या आदेशाने आळेफाटा येथील पाच दुकाने सीलबंद करण्यात आले आहेत. आशीर्वाद फूड अँड आईसक्रीम पार्लर,शिवकृपा सुपर शॉप,आनंद ए वन चिकन शॉप,तर या आधी मयूर कलेकशन, कुंदन कलेकशन ही दोन अशी पाच दुकाने ग्रामपंचायतीने सीलबंद केली आहेत.तर आळे ग्रामपंचायत हद्दीतील माऊली स्टील डेपो,९९ @ शॉप,श्रीराम ट्रेंडिंग कंपनी,वर्धमान सुपर
शॉपी,साईकृपा मोटर्स,सूरज जनरल स्टोअर्स अशी सहा दुकाने सीलबंद करण्याचे आदेश तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी आज गुरुवार (दि.15) रोजी दिले आहेत.सीलबंद केलेली दुकाने पुढचे सात सीलबंद ठेवली जाणार आहेत.