पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या नवीन रुग्णाल्यांच्या इमारती,घरकुल, बालेवाडी येथे रुग्णांची ऑक्सीजन व्हेंटिलेटरची सोय होईल असे कोविड सेंटर त्वरित सुरू करून तडफडून मरणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवा. – मारुती भापकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ४ मे २०२१ पिंपरी-चिंचवड शहरात रोज अडीच ते तीन हजार कोरोना बाधित रुग्ण मिळून येत आहेत. दररोज शंभरच्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. महापालिका रुग्णालय, खाजगी रुग्णालय, जम्बो कोविड सेंटरमध्ये आयसीयु, ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर बेड बाबत विचारणा केली असता बेड शिल्लक नाही. रुग्ण वेटिंग वर आहेत. अशे उत्तर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळते. त्यामुळे भोसरी व चिंचवड विभागात दोन जेम्बो कोविड केअर सेंटर उभारावेत. अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिका प्रशासनाने तशी तयारी सुरू केली होती. शहरात खुल्या मैदानावर दोन जेम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र नव्याने जेम्बो सेंटर उभारणी करण्यापेक्षा पालिकेने बनवलेल्या नवीन हॉस्पिटलच्या इमारतीत कोविड सेंटर रुग्णांच्या सोयीसाठी सुरू करावेत अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आयुक्त, महापौर यांना केली आहे. हाच मुद्दा पकडून भोसरी गाव जत्रा मैदान व सांगवी पीडब्ल्यूडी मैदान येथे जेम्बो कोविड केअर सेंटर उभे करण्याची तयारी पावसाळ्याच्या तोंडावर करू नये अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील जेम्बो
कोविड उभारण्याच्या कामाच्या आठ कोटी रकमेच्या विद्युतच्या कामाच्या निविदेवर संशय व्यक्त करत जेम्बो रुग्णालय उभारण्यास विरोध केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका रुग्णालय व खाजगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सीजन बेड, व्हेटिलेटर बेड उपलब्ध नाहीत‌. रुग्ण व नातेवाईक वेटिंग वर आहेत. या परिस्थितीमुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन कोविड सेंटर सुरू करण्या बाबत सकारात्मक आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आकुर्डी,थेरगाव रुग्णालयाच्या इमारती व घरकुल, बालेवाडी येथे सेंटर उभारावेत अशी त्यांची मागणी आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगात कुरघोडीचे राजकारण न करता अजिबात वेळकाढूपणा न करता मा. महापौरांनी या गंभीर विषयासंदर्भात सर्वपक्षीय व प्रशासनातील प्रमुखांची बैठक लावून या दोन्हीपैकी योग्य निर्णय तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा. दोन पर्यायांपैकी कुठल्याही एका योग्य पर्यायाची न