रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने वीटभट्टी मजूर महिला व बालकांसमवेत बालदिन व भाऊबीज साजरी

नारायणगाव:- (किरण वाजगे)
रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने १४ नोव्हेंबर बालदिन, भाऊबीज व दीपावली पाडव्याच्या निमित्ताने सावरगाव येथील वीट भट्टी कामगारांबरोबर भाऊबीज व बालदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने समाजातील कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या व्यक्ती, ऊसतोडणी मजूर अशा आर्टिकदृष्ट्या दुर्बल कष्टकरी व्यक्तींना भेटवस्तू दिल्या जातात .
या दिवाळीच्या निमित्ताने वीटभट्टी मजुरांच्या मुलांना टी शर्ट व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच दीपावलीच्या भाऊबीज निमित्त महिलांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रवींद्र वाजगे यांनी दिली.
याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रवींद्र वाजगे, आयपीपी रो.डॉ. श्रीकांत फुलसुंदर , रो. अंबादास वामन, रो. बाळासाहेब गिलबिले,रो. रामभाऊ सातपुते व रो. नारायण आरोटे उपस्थित होते यावेळी सावरगाव पाबळवाडी, वाणीमळा येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलावर्ग बाल दिनाच्या निमित्ताने लहान मुले मोठ्या आनंदाने या उपक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *