बिरसा ब्रिगेडच्या पुढाकाराने पश्चिम आदिवासी पट्टयातील बेरोजगार तरूणांना महावितरणा मार्फत रोजगार संधी उपलब्ध होणार…

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
वीज ग्राहकांच्या मिटरचे रिडिंग घेण्यासाठी त्याच भागातील युवकांना मिळणार संधी.
वीज हा आदिवासी भागातील अती महत्वाचा विषय आहे. परंतु आदिवासी भाग उंच डोंगर रांगामुळे व घनदाट जंगलामुळे विजेच्या अनेक समस्यांचा ससेमिरा नेहमीच आदिवासींचा पिच्छा करत असतो. त्यातच वीज नसताना येणारी भरमसाठ वीज बिले हा नेहमीचाच विषय झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन दि. २२ जून रोजी दुपारी चार वाजता बिरसा ब्रिगेड आंबेगावने महावितरण आंबेगावचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घातूळे यांची भेट घेतली.
भरमसाठ येणारी वीज बिले कमी करण्यासाठी महावितरणने तळेघर व अडिवरे येथे सोय उपलब्ध केली पण हा प्रश्न मुळात का निर्माण होत आहे. त्यावर मात्र योग्य उपाय निघाला नव्हता. मुळातच वीज मीटरची रिडींग घेतली जात नसल्याने अंदाजे मागील बिलाच्या आधारे पुढील वीज बिले दिली जात असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. असे लक्षात घेऊन आदिवासी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. या हेतूने मीटर रिडिंगचे काम याच भागातील तरुणांना मिळाल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न तर सुटेलच पण वेळच्या वेळी रिडींग घेतल्याने भरमसाठ येणाऱ्या वीज बिलांचा प्रश्न निकाली निघणार आहे. रिडिंगचे ठेकेदार गणेश मशेरे यावेळी उपस्थित होते. त्यांनी पुढील आठ दिवसात या भागातील पाच ते सात तरुणांना प्रशिक्षण देऊन काम देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार या कामाची आवड व रोजगाराच्या संधीची गरज असणाऱ्या तरुणांनी पुढील दोन दिवसात बिरसा ब्रिगेड आंबेगावचे प्रसिद्धी प्रमुख संतोष तिटकारे यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा 9850317027.

Advertise


   या भेटीवेळी बिरसा ब्रिगेड आंबेगावचे कार्याध्यक्ष प्रवीण पारधी यांनी संघटनेची बाजू अधिकाऱ्यां समोर मांडली.
भेटीच्या वेळी तालुकाध्यक्ष आदिनाथ हिले, मातृशक्ती प्रमुख उमाताई मते, प्रसिद्धीप्रमुख संतोष तिटकारे, युवा नेते मारुती दादा केंगले, ब्रिगेडचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर शेखरे, रमेश आंबवणे तसेच म्हातारबा वाडीचे अध्यक्ष अशोक पोटे, संदीप केवाळे, दिगंबर केंगले, प्रकाश केंगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *