पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचा स्नेह भेट सोहळा उत्साहात संपन्न

कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांवर लक्ष द्यावे – न्या.बी.जी.कोळसे पाटील

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी दीपावली पाडव्यानिमित्त दीपावली स्नेहभेट सोहळा आयोजित करण्यात आला या दरम्यान दिवाळी फराळ आणि मान्यवरांचा मार्गदर्शन पर संवाद काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनुभवला.

दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील साहेब, युवा गांधीवादी विचारवंत वक्ते संकेत मुनोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, हे विशेष अतिथी या नात्याने उपस्थित होते.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले, “देशातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि तरुणांनी ‘डरो मत’ या विशेष संदेशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, निर्भीडपणे मतदान करत, निर्भीडपणाने या देशातील सत्ता ही बदलवून टाकण्यासाठी सर्वांनी अधिक जोमाने पुढे येणे गरजेचे आहे कारण मोदी सरकारची राजवट ही फसवी दिशाभूल करणारी जनतेला लुटणारी आणि भांडवलदारांचा फायदा करून देणारी राजवट आहे गेल्या दहा वर्षात या मोदी सरकारने ठोस असे कोणतेही काम या देशात केलेले दिसून येत नाही केवळ खोट्या कामांचा प्रपोगंडा करण्यामध्ये हे सरकार आणि त्यांचे मंत्री व्यस्त असतात, वन नेशन वन इलेक्शन या देशाला नकोय तर या देशाला चांगल्या शाळा, चांगले रुग्णालये चांगला पारदर्शक कारभार आणि एकंदरीतच लोकशाही व्यवस्थेचे अधिक मजबुतीकरण हे हवे आहे. मतदार याद्यांकडे अधिकाधिक प्रमाणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे असेही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशेषतः सांगितले. या देशामध्ये आरएसएस भाजप व समविचाऱ्यांचा कायम दुफली माजवण्याचा, जातीय द्वेष निर्माण करण्याचा आणि स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा डाव गेल्या अनेक वर्षांपासून आहे तो जाणकारपणे परतवून लावून आपण सुजान दक्ष आणि जबाबदार नागरिका प्रमाणे भूमिका बजावली पाहिजे, आता जर का यावेळी मोदीचे सरकार बदलले नाही तर या देशामध्ये पुन्हा लोकशाही अस्तित्वात राहील असे वाटत नाही त्यामुळे सर्वांनी या परिवर्तनाच्या लढायला स्वीकारून आपापली जबाबदारी निर्भीडपणे बजावने गरजेचे आहे”.

याप्रसंगी गांधीवादी विचारवंत संकेत मूनोत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतना महात्मा गांधी, नेहरू, भारत आणि भारतातील सर्व थोर महापुरुषांचे कार्य यावर प्रकाश टाकत उपस्थिताना मार्गदर्शन केले.याप्रसंगी पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, जेष्ठ महिला नेत्या श्यामला सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, छायावती देसले, अर्चना राऊत, अबुबकर लांडगे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर मनीषा गरुड, कौशल्य विकास विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, सुप्रिया पोहरे, ग्राहक विभागाचे अध्यक्ष जेवियर अँथनी, इस्माईल संगम, भास्कर नारखेडे, उमेश बनसोडे, योगेश बहिरट, सुधीर गायकवाड, रवी कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *