लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीकडून ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील ऊसतोड कामगारांना लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने दिवाळी भेट देण्यात आली.अशी माहिती अध्यक्ष लायन्स योगेश रायकर यांनी दिली.
हिवरे तर्फे नारायणगाव येथे तात्पुरते राहायला आलेल्या सुमारे १०० ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ऊसतोड कामगार महिलांना नवीन साडी, मिठाई व लहान मुलांना कपडे देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष योगेश रायकर म्हणाले की, लायन्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी तालुक्यामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. काही दिवसांपूर्वीच क्लबने रक्तदान शिबीर भरविले होते. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीचे नियम सांगून रिफ्लेक्टरही बसविण्यात आले होते. दिवाळीच्या या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष योगेश रायकर, सचिव राजेंद्र देसाई, खजिनदार संजय शिंदे, डॉक्टर प्रवीण शिंदे, सारिका रायकर, नीता देसाई, रोहिणी शिंदे, डॉक्टर अनुष्का शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *