जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

०२ डिसेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी गुजरातमधील कलोल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावणाबाबत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रावणाच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाला रामसेतूचाही तिटकारा आहे. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचा अवमान करण्यासाठी कोण सर्वाधिक शिव्या देऊ शकेल, याबाबत स्पर्धा लागली आहे. मला शिवीगाळ करण्यासाठी रावणाला रामायणातून आणले. रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे असे सांगून ते म्हणाले की, जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *