संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने साफसफाई करणाऱ्या महिलांसोबत भाऊबिज साजरी

आधी केले मग सांगितले, भाऊबिज उत्साहात साजरा

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने प्रभाग क्र १७ मधील आरोग्य विभागाच्या साफसफाई करणाऱ्या महिलांसोबत भाऊबिज साजरी करण्यात आली. एकुण ३३ महिलांनी प्रतिष्ठानच्या सभासदांना औक्षण केले.प्रतिष्ठानच्या वतीने सर्व महिला भगिंनीना भाऊबिजेची भेट म्हणून एक साडी आणि सोबत साखर वाटप करण्यात आली.सोबत सर्वांना नाष्टा वाटप केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ सुशिल मुथियान आणि ब प्रभाग आरोग्य अधिकारी श्री महादेव शिंदे जेष्ठ सभासद सेवानिवृत्त शिक्षक श्री प्रभाकर मेरुकर रमेश सरदेसाई यांच्या हस्ते वाटप केले.प्रास्तविक डॉ मोहन गायकवाड यांनी केले.डॉ सुशिल मुथियान यांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.संस्कार प्रतिष्ठान नेहमी प्रत्येक थरातील नागरिकांसोबत सलोख्याचे नाते तयार करते.आरोग्य अधिकारी महादेव शिंदे सर म्हणाले आजकाल भाऊबिज साजरी करायला सुध्या लोकांना वेळ मिळत नाही आमच्या महिलांना एक बहिण म्हणून प्रतिष्ठानने चांगला मान दिला.संस्कार प्रतिष्ठान नेहमी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असते.
सर्वांना भाऊबिजेच्या शुभेच्छा दिल्या. आभार सौ कल्पना तळेकर यांनी मानले यावेळी शब्बीर मुजावर गोविंद चितोडकर सायली सुर्वे वसंत दळवी संध्या स्वामी सुनिता गायकवाड इशिता गायकवाड भरत शिंदे मिनाक्षी मेरुकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *