आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.1/6/2021
डेव्हलोपमेंट सपोर्ट सेंटर, आर सी आर सी,स्वास्थ्य फाऊंडेशन कडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिमिटर भेट
बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर
बेल्हे l करोना महामारीच्या जीवघेण्या संकटात एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेत डेव्हलोपमेंट सपोर्ट सेंटर, आर सी आर सी आणि स्वास्थ्य फाऊंडेशन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा (ता.जुन्नर) या ठिकाणी १८ ऑक्सिमिटर, प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी याठिकाणी १० ऑक्सिमिटर प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे या ठिकाणी ३ व पुढच्या दोन ते तीन दिवसांत १५ देणार आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम आदरणीय भरत राऊत टीम लीडर डेव्हलोपमेंट सपोर्ट सेंटर,अग्रीकल्चर डिपार्टमेंट चे मेंबर प्रशांत साळवे, उत्तम जाधव यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार,
निमगाव सावा गावचे उपसरपंच किशोर घोडे,
योगेश गाडगे,सोपान गाडगे,संदीप (भाऊ) थोरात तसेच
प्राथमिक आरोग्य केंद्राचे संभाजी घोडे, मेडिकल ऑफिसर शेख मॅडम , आशा वर्कर, सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते.