बालचमुनीं साजरी केली आनंदाची दिवाळी…

आकाश कंदीलांची सजावट, रांगोळी पणत्या, किल्ला आणि त्यावरील मावळे, सोबतीला गोड गोड खाऊ अन् दिवाळी सणांची गाणी अशा सुंदर वातावरणात, बालचमुनीं दिवाळी सुट्टीपूर्वी, आनंदाची दिवाळी साजरी केली.


पीसीएमसी पब्लिक स्कूल रहाटणीच्या बालवर्गातील मुलींनी खेळाबरोबर गाण्यांचा ही आनंद घेतला. समाज सहभागांतर्गत इनरव्हील क्लबच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .


यावेळी क्लबच्या अध्यक्षा अंजली दाशरती यांच्या हस्ते मुलींना गोष्टीची पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी सुनीता काकडे, कविता गोडांबे, मीना शिवरामवार, अंजली सप्रे. आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बालविभाग प्रमुख पौर्णिमा पाचबोले व संगीता राजगुरू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शोभा घावटे यांनी स्वागत केले तर वैशाली कुरुपखिळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *